Saturday, March 18, 2006

निमित्त मात्र

सूर्योदयाच्या वेळी
पूर्वेला तांबडं फुटतं
एक किरण बनून
आकाश उजळवासं वाटतं
...प्रत्येकवेळी उजळवणं मात्र जमतंच असं नाही
...माझ्याशिवाय सूर्याचं उगवणंही थांबत नाही

फुलांचा ताटवा
मन माझं फुलतं
छोटसं फुलपाखरू बनून
मधुरस टिपावंस वाटतं
...प्रत्येकवेळी टिपणं मात्र जमतंच असं नाही
...माझ्याशिवाय फुलांचं फुलणंही थांबत नाही

निळं - तांबडं आकाश
नेहमीच मला खुणावतं
स्वच्छंदी पक्षी बनून
उंच उडावंस वाटतं
...प्रत्येकवेळी उडणं मात्र जमतंच असं नाही
...आकाश जवळ भासलं तरी क्षितिजाला टेकत नाही

काळीज भरभरुन
सारखं लिहावस वाटतं
इवलासा शब्द बनून
कविता जगावंस वाटतं
...प्रत्येकवेळी जगणं मात्र जमतंच असं नाही
...मरण भेटेपर्यंत आयुष्यही जगायचं थांबत नाही

5 comments:

Nandan said...

chhan. pratyekveli... chi oL vishesh aavadli.

Sumedha said...

फारच सुंदर! प्रत्येकवेळी नाही तरी कधीतरी जमून जातंच नं?

श्रद्धा कोतवाल said...

wow ... सहीच! आधीचं लिखाणदेखील खूप आवडलं.

गिरिराज said...

वाह् रे! तुझा आणि श्रचा Blog एकाच वेळी सापडले!
छानच!

परागकण said...

vaa ! good one!