Saturday, February 25, 2006

पुन्हा एकदा..

लाचार काया
तुटतो जीव
गात्रांचे पडघम
पुन्हा एकदा

भुकेला तान्हा
बाळमुठी चोखे
आटलां पान्हा
पुन्हा एकदा

देहात नशा
नजरेत विखार
स्पर्षलोलूप नर
पुन्हा एकदा

उमलतां रात्र
समर्पिते देह
त्याच वणव्यात
पुन्हा एकदा...

2 comments:

Tulip said...

हाय अभी! खुप छान. ही कविता पण आणि आधीचे पोस्ट ( मन्या ) पण.
लिहित जा.

Nandan said...

Chhan aahe kavita, aavadli.